कडा - शहरातील मध्यवर्ती बसस्थानकच्या समोर टेलिफोन वायरींगचे काम करण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी दोन मोठे खड्डे खणण्यात आले होते. संबंधित विभाग

कडा – शहरातील मध्यवर्ती बसस्थानकच्या समोर टेलिफोन वायरींगचे काम करण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी दोन मोठे खड्डे खणण्यात आले होते. संबंधित विभागाने वायरींगचे काम पूर्ण केले असले तरी खड्डे मात्र आजतागायत तसेच उघडे ठेवण्यात आले होते. या ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना या खड्ड्यांमुळे ये-जा करताना मोठी अडचण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठा अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली होती. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यद यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली असता संबंधित कंपनीच्या अधिकार्यांनी दखल घेत तातडीने खड्डे बुजवून घेण्यासाठी कर्मचार्यांना पाठवले व खड्डे बुजवून घेतले. शासकीय कामासाठी खड्डे खणणे ठीक आहे, पण काम संपल्यानंतर ती जागा पूर्ववत करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून खड्डे बुजवून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यद यांनी मागणी करताच दखल घेऊन खड्डे बुजवून घेण्यात आले. या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून रहेमान सय्यद यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS