देगलूर : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मारकासह आदिवासी समाज मंदिरासाठी देगलूर नगरपरिषदेने हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयाबद्दल

देगलूर : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मारकासह आदिवासी समाज मंदिरासाठी देगलूर नगरपरिषदेने हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयाबद्दल नगरपरिषद प्रशासन व पदाधिकार्यांचे आभार मानण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज (रविवारी सकाळी) कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
देगलूर नगरपरिषदेने तुकाराम नगरी येथील गट क्र. 314/8 मधील जागा ठरावाद्वारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी तसेच आदिवासी समाज मंदिरासाठी उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेल्या या मागणीला नगरपरिषदेच्या निर्णयामुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमान, संघर्ष आणि हक्कांच्या लढ्याचे प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणार्या स्मारकासाठी जागा मिळाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
त्याचबरोबर समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व सामुदायिक उपक्रमांसाठी आदिवासी समाज मंदिरालाही हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता साई गणेश बाल रुग्णालयाच्या बाजूला तुकाराम नगरी येथे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे आदिवासी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येणार आहेत. या सोहळ्यास आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS