HomeUncategorized

फलटणमध्ये भर दिवसा 50 हजाराची रोकड लंपास

फलटण / प्रतिनिधी : शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण राजवाडा शाखेसमोर अज्ञात व्यक्तीने पाठीमागे पैसे खाली पडले आहेत. असे म्हणून दिशाभूल

डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू
भाषा-संस्कृतीचे महत्व पालकांमध्ये रुजणे गरजेचे : प्रा. वैजनाथ महाजन
सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

फलटण / प्रतिनिधी : शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण राजवाडा शाखेसमोर अज्ञात व्यक्तीने पाठीमागे पैसे खाली पडले आहेत. असे म्हणून दिशाभूल करून पडलेले पैसे उचलत असताना मोटार सायकल हँण्डलला अडकविलेली 50 हजार रुपये रक्कम असलेली पैशांची पिशवी अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मुगूटराव सस्ते (रा. निरगुडी, ता. फलटण) यांना दि. 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1:30 वाजणेचे सुमारास फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजवाडा शाखेसमोर मोटरसायकलवरून आलेल्या एक अज्ञात व्यक्तीने पैसे पाठीमागे खाली पडले आहेत, असे म्हणून दिशाभूल केली. यावेळी सस्ते ते पडलेले पैसे उचलत असतांना सस्ते यांच्या मोटार सायकलच्या पुढील हँण्डलला अडकविलेली 50 हजार रुपये रक्कम ठेवलेली पांढर्‍या रंगाची प्लॅस्टीकची पैशांची पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS