Homeताज्या बातम्या

देवा भाऊ, आमच्याकडे बघा! बीडमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून लागलेल्या बॅनर्सनी वेधले लक्ष

बीड - महाराष्ट्रात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आणि ’एजंट मार्फत सुरू असलेल्या भ्रष्टाचारा’विरोधात आता बीड शहरात राजकीय वातावरण

हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचवणार : जलसंपदा मंत्री विखे
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप

बीड – महाराष्ट्रात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आणि ’एजंट मार्फत सुरू असलेल्या भ्रष्टाचारा’विरोधात आता बीड शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांच्या वतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये झळकवण्यात आलेल्या बॅनरने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बॅनरच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. बॅनरवर जनतेला धमकी देण्याची भाषा बंद करा, देवा भाऊ, आमच्याकडे बघा अशा आशयाचा मजकूर लिहीत रोखठोक भूमिका मांडण्यात आली आहे. गौरव राठोड यांनी सवाल उपस्थित करताना म्हटले आहे की, 2014 पासून पुढील काळात महसुली व इतर करांमधून सरकारकडे जमा झालेला निधी तसेच देशाने घेतलेल्या कर्जाचा पैसा नेमका कुठे खर्च करण्यात आला, याचा हिशोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर द्यावा. या संपूर्ण प्रकरणात गौरव राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. तारीख तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा आणि ठिकाणही तुम्ही ठरवा; मी तुमच्यासमोर पुराव्यांसह चर्चा करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? असा थेट सवाल त्यांनी बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. गौरव राठोड यांनी वडवणी तालुक्यातील कुप्पा आगर तांडा या ठिकाणी भ्रष्टाचार प्रदर्शन भरवलेला आहे. या भ्रष्टाचार प्रदर्शनामध्ये देशभरात व महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे व कशाप्रकारे सामान्य जनतेची लूट केलेली आहे हे बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे. बीड शहराच्या मुख्य चौकांमध्ये लागलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राठोड यांच्या या जाहीर आव्हानाला सत्ताधार्‍यांकडून किंवा शासनाकडून काय प्रतिक्रिया मिळते आणि ते या चर्चेचे आव्हान स्वीकारतात का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि बीडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS