कर्जत :“एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे, इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे सामान्य जनता होरपळत आहे, तर दुसरीकडे सरकार फक्त दिखाऊपणा आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे,” अशा शब्दांत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती उमेश परहर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.या आंदोलनामध्ये जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, रघुआबा काळदाते, जिल्हा परिषद माजी सभापती उमेश परहर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, विजय मोडळे, भूषण ढेरे, मोहनराव गोडसे, दीपक यादव, नामदेव थोरात, सुधीर जगताप, नगरसेवक रजाक झारेकरी,मंगेश नेवसे, मनोज गोडसे, सुमित भैलूमे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे यांनी देखील यावेळी सरकारच्या धोरणावर टीका केली. अरे यांचे सरकार सत्तेवर आहे मुख्यमंत्री एक दिवस मोटरसायकलवर जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गाड्यांचा लवाजमा घेऊन फिरतात. घोडा गाड्यावर फिरणारे हे ढोंगी बाळाचे नेते भाजपचेच आहेत. यामुळे या लबाड सरकारवर आता विश्वास ठेवू नका अशी टीका बाळासाहेब साळुंखे यांनी केली.यावेळी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील म्हणाले की, या देशातील जनतेने आतापर्यंतचे सर्वात वाईट सरकार सध्या अनुभवी आहे. पंतप्रधान जनतेला सांगतात की तुम्ही परदेशात जाऊ नका आणि स्वतः लगेच पाच देशांच्या दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान यावरून या सरकारचे श्री पाटील यांनी चांगलेच वाभाडे काढले. यावेळी विजय मोडळे, नामदेव थोरात यांनी देखील भाषणांमधून सरकारवर जोरदार टीका केली.आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी “सरकार हाय हाय”, “कांद्याला भाव द्या”, “महागाई कमी करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसीलदार रवी सत्वन व पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांना मागण्यांची निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांच्या मागण्याशेतकऱ्यांच्या कांद्याला तात्काळ हमीभाव द्यावा, वाढलेले इंधन दर तात्काळ मागे घ्यावेत, गॅस टंचाई दूर करावी तसेच वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

COMMENTS