Homeताज्या बातम्याअहमदनगर

अधिकृत आधार सेवा केंद्राचाच वापर करा :  कारंडे 

कर्जत : नागरिकांना आधारसंबंधित सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शासनमान्य आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कर्जत तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांच्या हस्ते झाले. कर्जत तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी मोठी सोय ठरणार आहे.उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार मोसिन शेख, परशुराम होगले, धुळाजी केसकर, बाबू होगले, संतोष निंबाळकर, समशेर शेख, मिनीनाथ धांडे, शशिकांत शेळके, परवेज शेख तसेच रामभाऊ पोटरे उपस्थित होते.यावेळी केंद्र चालक सचिन पोटरे म्हणाले,“या केंद्रात नवीन आधार नोंदणी, आधारपत्र अद्ययावत करणे, भ्रमणध्वनी क्रमांक जोडणी, पत्ता बदल, जन्मतारीख दुरुस्ती, बोटांचे ठसे व नेत्रनोंद अद्ययावत करणे तसेच इतर विविध आधारसंबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आधार कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.”नागरिकांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि शासनमान्य सेवा देणे हा केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकृत सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी नागरिकांनी केवळ शासनमान्य आधार सेवा केंद्राचाच वापर करावा, जेणेकरून सुरक्षित आणि अधिकृत सेवा मिळतील, असे आवाहन केले.

कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

COMMENTS