राहाता : ग्रामीण भागातील रुग्णांना रात्रीच्या वेळी स्वतः रुग्णालयात दाखल करून वेळेत उपचार मिळवून देत शेकडो लोकांचे प्राण वाचविणारे पुखराज पिपाडा यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा, असे आवाहन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.गुरुदेव दत्त पतसंस्थेचे माजी अध्यक्ष पुखराज पिपाडा यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त गणेश परिसराच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, बाळासाहेब गाढवे, अनिल पिपाडा, रावसाहेब गाढवे, बाबासाहेब गोरे, नरेंद्र पिपाडा, ज्ञानेश्वर चौधरी, राजू मुनावत, दिलीप क्षीरसागर, सुरेश नाबरिया, नेमिचंद लोढा, डॉ. संतोष भवर, महावीर पिपाडा, पारस पिपाडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पुखराज पिपाडा यांच्या सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले, “पुखराज पिपाडा हे समाजातील सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी गुरुदेव दत्त पतसंस्था प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि दूरदृष्टी ठेवून चालवत अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला. पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांचे संसार उभे राहण्यास मदत झाली. त्यांच्या कार्यामुळे समाजात विश्वास, आपुलकी आणि सेवाभाव अधिक दृढ झाला आहे.” ‘साधी राहणी आणि उच्च विचार’ या तत्त्वाचे ते खऱ्या अर्थाने उदाहरण आहेत,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात पुखराज पिपाडा यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS