Homeअहमदनगर

कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात

कर्जत : शहरातील एका कॅफेच्या आड सुरू असलेल्या संशयास्पद प्रकारावर कर्जत पोलिसांनी शनिवारी (दि. ६) धडक कारवाई केली. या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध ग

अल्पवयीन मुलास मारहाण  
तपोवन रोडवर ऑनलाईन ‘बिंगो’ जुगारावर छापा 
जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात
कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे दोन जोडप्यांना पकडले. पोलिसांनी केला गुन्हा  दाखल..

कर्जत : शहरातील एका कॅफेच्या आड सुरू असलेल्या संशयास्पद प्रकारावर कर्जत पोलिसांनी शनिवारी (दि. ६) धडक कारवाई केली. या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जोडप्यांना समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे शनिवारी सायंकाळी पथकासह शहरात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. कर्जत येथील काळदाते संकुलातील एका कॅफेमध्ये तरुण मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जात असून त्याबदल्यात तासानुसार शुल्क आकारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच आवश्यक परवानगीविना खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचेही निदर्शनास आले.
माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी तत्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास झालेल्या कारवाईत कॅफेमध्ये दोन जोडपी आढळून आली. चौकशीनंतर संशयास्पद प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
 या प्रकरणी कॅफे चालक रोहित अशोक होले (वय २६, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 दरम्यान, नव्यानेच कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे शहरातील अशा प्रकारचे व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS