Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन

सोलापूर : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकरी तसेच नागरिकांनी विनाकारण घाईगडबड करून इंधनाची साठवणूक करू नये, असे आवाहन कृष

केज येथे सत्यमेव जयते फार्मर कप आणि उमेद अंतर्गत आयोजित गटबांधणी कार्यशाळा
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
Dattatray Bharne took charge as agriculture minister first announcement  about price of agricultural produce कृषिमंत्र्याचा पदभार स्विकारताच  दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

सोलापूर : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकरी तसेच नागरिकांनी विनाकारण घाईगडबड करून इंधनाची साठवणूक करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. राज्यात काही ठिकाणी इंधन टंचाईच्या अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत असतानाच त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना भरणे म्हणाले की, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी जितके आवश्यक असेल तितकेच इंधन घ्यावे आणि अनावश्यक साठवणूक टाळावी. यावेळी त्यांनी चांगल्या पावसासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थनाही केली. हवामान खात्याचे अंदाज चुकवत राज्यात भरघोस पाऊस पडावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील काही भागांत इंधन मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. परभणीमध्ये पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या असून काही ठिकाणी ड्रम आणि कॅनमधून इंधन घेण्यावरून वाद व हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. शेतीच्या कामासाठी डिझेल मिळण्यात अडचणी येत असताना काही ठिकाणी अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

COMMENTS