Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कोयटे

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून व्यापार वृद्धी आणि बाजारपेठेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शहराची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी महासंघाकडून सातत्याने ठोस पावले उचलली जात असते नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची फेर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष पदी तर कार्याध्यक्ष पदी अजित लोहाडे व सुधीर डागा यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर नामांकित उद्योजक संजय भन्साळी व एस.जे.एस. हॉस्पिटलचे  चांगदेव कातकडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच युवा उद्योजक यश विसपुते यांची संचालक म्हणून तर  कार्यकारिणीत अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष अजित लोहाडे व सुधीर डागा, महासचिव प्रदीप साखरे, उपाध्यक्ष राजकुमार बंब, नारायण अग्रवाल, संजय भन्साळी, केशवराव भवर, आशुतोष पटवर्धन, चांगदेव कातकडे, खजिनदार तुलसीदास खुबाणी, सचिव गुलशन होडे, सहसचिव महावीर सोनी व किरण शिरोडे यांचा समावेश आहे. तसेच संचालक मंडळात कृष्णाशेठ उदावंत, योगेश बागुल, बबलु वाणी, चेतन खुबाणी, सुमित भट्टड, शरद खरात, दिपक गुजराथी, हेमचंद्र भवर, संजय दुशींग, संदीप काबरा, युवराज गांगवे, आनंद लोढा, प्रमोद मुंदडा, अक्षय सोनेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या युवा आघाडीच्या समन्वयक पदी हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, धीरज कराचीवाला, यश विसपुते, अक्षय गिरमे, गोल्डी शिरोडे यांची या बैठकीत निवड करण्यात आली. संबंधित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
भांबोरा येथील सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित
जुन्या बसस्थानकाच्या विकासातून रोजगारनिर्मितीची मागण; आ. गर्जे यांचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून व्यापार वृद्धी आणि बाजारपेठेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शहराची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी महासंघाकडून सातत्याने ठोस पावले उचलली जात असते नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची फेर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष पदी तर कार्याध्यक्ष पदी अजित लोहाडे व सुधीर डागा यांची फेर निवड करण्यात आली आहे.

तर नामांकित उद्योजक संजय भन्साळी व एस.जे.एस. हॉस्पिटलचे  चांगदेव कातकडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच युवा उद्योजक यश विसपुते यांची संचालक म्हणून तर  कार्यकारिणीत अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष अजित लोहाडे व सुधीर डागा, महासचिव प्रदीप साखरे, उपाध्यक्ष राजकुमार बंब, नारायण अग्रवाल, संजय भन्साळी, केशवराव भवर, आशुतोष पटवर्धन, चांगदेव कातकडे, खजिनदार तुलसीदास खुबाणी, सचिव गुलशन होडे, सहसचिव महावीर सोनी व किरण शिरोडे यांचा समावेश आहे. तसेच संचालक मंडळात कृष्णाशेठ उदावंत, योगेश बागुल, बबलु वाणी, चेतन खुबाणी, सुमित भट्टड, शरद खरात, दिपक गुजराथी, हेमचंद्र भवर, संजय दुशींग, संदीप काबरा, युवराज गांगवे, आनंद लोढा, प्रमोद मुंदडा, अक्षय सोनेकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या युवा आघाडीच्या समन्वयक पदी हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, धीरज कराचीवाला, यश विसपुते, अक्षय गिरमे, गोल्डी शिरोडे यांची या बैठकीत निवड करण्यात आली. संबंधित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS