कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. तंत्रनिकेतनातील ३५ विद्यार्थ्यांची सुंगवू हाय टेक या मुळच्या दक्षिण कोरियाच्या ऑटोमोबाईल घटक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आकर्षक वेतनावर निवड झाली आहे. प्रशिक्षण व नियुक्ती विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाली.उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती आणि कौशल्य विकास उपक्रमांचे हे यश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना रोजगार, उद्योग किंवा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे प्राचार्य, विभागप्रमुख तसेच प्रशिक्षण व नियुक्ती विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.यामध्ये यंत्र अभियांत्रिकी शाखेतील ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात अक्षय कैटाके, कार्तिक वर्खडे, आदित्य पवार, अभिषेक रहाणे, चैतन्य देवकर, अभिषेक काळे, विकास मतसागर, आकाश जाधव, किरण त्रिभुवन, सिद्धार्थ वणे, सनी गायकवाड, समर्थ रहाणे, विशाल धनवटे, ऋतिक गव्हाणे, गौरव सोनवणे, आदित्य विश्वंभर, सार्थक सोनवणे, शिवराम शिरसाठ, विवेक वणे, श्रद्धा डेंगळे, अतुल खरड, कोमल दैने, नील पवार, प्रथमेश त्रिभान, साक्षी गुरसळ, ऐश्वर्या शिंदे, राजश्री बोठे, निकिता गांगुर्डे, विद्या जगताप, प्रियंका घोपाळ, बब्बी कुमार, सोनू कुमार, राजू प्रसाद, सनी कुमार आणि मोहम्मद सलाउद्दीन यांचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत.संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.“मी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे. शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बनावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. संजीवनीत प्रवेश घेतल्यानंतर आमचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास होता. प्रशिक्षण व नियुक्ती विभागाने मुलाखतीची उत्तम तयारी करून घेतली आणि त्यामुळेच आज आम्हाला ही संधी मिळाली,” – आकाश जाधव, विद्यार्थी

COMMENTS