Homeताज्या बातम्याअहमदनगर

गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

कर्जत : कर्जत उपविभागीय पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्टे विक्रीसाठी आणणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. आरोपीकडून दोन गावठी बनावटीची पिस्टले, दोन जिवंत काडतुसे व एक सॅक असा एकूण ६२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. १७ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार कर्जत उपविभागाचा पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने गस्त घालत असताना पोलीस हवालदार अमोल भैलुमे यांना गुप्त माहिती मिळाली. चापडगाव ते माही-जळगाव हायवे रोडलगत कर्जत फाटा येथे एक संशयित इसम उभा असून त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी तत्काळ माहितीची शहानिशा करण्याचे आदेश दिले.पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम संशयितरीत्या उभा असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्याच्या पाठीवरील सॅकची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये दोन गावठी कट्टे (पिस्टल) व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.चौकशीत आरोपीने आपले नाव नागेश्वर उर्फ नागेश महेंद्र पावरा (वय २१, रा. बुडकी, पोस्ट बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे सांगितले. तसेच जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध धुळे जिल्ह्यासह इतर ठिकाणी विविध गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार अमोल भैलुमे, सागर जंगम, प्रताप देवकाते, मच्छिंद्र जाधव व प्रकाश दंदाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

तपोवन रोडवर ऑनलाईन ‘बिंगो’ जुगारावर छापा 
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 
शेवगावात अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा१७० किलो साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

COMMENTS