Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योजक राहुल भारत लोखंडे यांची आत्महत्या

बीड : बीड शहरातील तरुण व होतकरू उद्योजक राहुल भारत लोखंडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. य

शहापूर शिवारात विवाहित महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह 
कौटुंबिक वादातून जन्मदात्याचा क्रूर अंत; चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या
जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   

बीड : बीड शहरातील तरुण व होतकरू उद्योजक राहुल भारत लोखंडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बीड शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल लोखंडे हे ‘नरेंद्र हार्डवेअर अँड स्टोअर्स’ या नावाने व्यवसाय करत होते. कमी वयातच त्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर यश संपादन केले होते. त्यांच्या कामकाजाची व्याप्ती मोठी असून त्यांनी अल्पावधीतच व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या अकस्मात निधनाने व्यावसायिक व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, राहुल लोखंडे यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी उखांडा (ता. पाटोदा, जि. बीड) येथे पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राहुल लोखंडे यांच्या निधनामुळे एक होतकरू व यशस्वी तरुण उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला असून त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS