Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट

https://www.youtube.com/watch?v=ycwoGezHCbI अहिल्यानगर : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर

पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार-डॉ. रॅपनवाड
अंगणवाडी मदतनीस वर 1 वर्षांपासून अत्याचार

अहिल्यानगर : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. माहेरून ४ लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून, एका २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
ही खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. प्रिया शुभम ढगे असे या मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. २०१४ ते २०२६ या दोन वर्षांच्या काळात प्रियाचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
वारंवार होणारा हा त्रास सहन न झाल्याने अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलले आणि विहिरीत उडी घेतली. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी तत्परता दाखवत पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

COMMENTS