Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक

बीड :जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे मोठी कारवाई करत

विनयभंग करणारा आरोपी पुण्यातून जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; एक महिन्यानंतर जेरबंद  
भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; 10घरफोड्या उघड – 78 लाखांचा मुद्देमाल जप्त
किनवट वन विभागाची ’सिंघम’ स्टाईल कारवाई; सागवान तस्करी करणारा पिकअपसह आरोपी जेरबंद

बीड :जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे मोठी कारवाई करत तब्बल 8 किलो 888 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे सिरसदेवी येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या गांजा साठवून त्याची विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या पथकाने सिरसदेवी येथील शेख रईस शेख युसूफ (वय 25) यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 66 हजार 640 रुपये किमतीचा 8 किलो 888 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) व 20(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्यासह पोउपनि सुशांत सुतळे, आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे तसेच तलवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या विरोधात सातत्याने कारवाई केली जात असून, अशा गुन्ह्यांवर कठोर पावले उचलली जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे.

COMMENTS