Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यातील शिंदे गावात मारहाणीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, एक ताब्यात

कर्जत :  तालुक्यातील शिंदे गावातील यात्रेदरम्यान ओंकार एकाड या तरुणाला तरुणीसोबत फिरताना काही जणांनी पाहिल्याने वाद निर्माण झाला आणि त्यातून मारह

भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
निंभोरे पाटील परिवारातील ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
Ahmednagar Crime a cruel man threw his two children into a well after an  argument with his wife in Karjat | Ahmednagar Crime : क्रूर पित्याने  पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीसोबत

कर्जत :  तालुक्यातील शिंदे गावातील यात्रेदरम्यान ओंकार एकाड या तरुणाला तरुणीसोबत फिरताना काही जणांनी पाहिल्याने वाद निर्माण झाला आणि त्यातून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेच्या धक्क्यातून २० वर्षीय ओंकार सुभाष एकाड  या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सुभाष बलभीम एकाड यांनी फिर्याद दिली आहे की, यात्रेच्या वेळी ओंकार हा एका तरुणीसोबत फिरत असताना काही नातेवाईकांच्या नजरेस पडला. त्यानंतर झालेल्या वादातून संबंधितांनी त्याला गावातच जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यानंतर ही त्याला जिवे मारण्याबद्दल धमकावण्यात आले होते. या प्रकारानंतर ओंकार मानसिक तणावात गेला आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी नमूद केले आहे.

घटनेनंतर नातेवाईकांनी कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल व साक्षीदारांच्या जबाबांनंतर अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी खांडवी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS