Homeताज्या बातम्याअहमदनगर

 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

सोनई : मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर लोखंडी चॉपर व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना चांदा येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या हा

 रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश चौघांना अटक ; ११ लाखांची सामग्री जप्त
शेवगावात अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा१७० किलो साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोनई : मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर लोखंडी चॉपर व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना चांदा येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या हात व मांडीवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश नारायण पाचोरे (वय २७) हे आपल्या घरासमोरील रस्त्यावर उभे असताना आरोपी श्रीकांत लक्ष्मीकांत कर्डीले हा दुचाकीवरून तेथे आला. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून आरोपीने प्रथम लोखंडी चॉपरने मारहाण केली. त्यानंतर चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर व डाव्या मांडीवर वार केले.या हल्ल्यात गणेश पाचोरे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, पूर्वीचा वाद आणि आरोपीचा हेतू याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.   

COMMENTS