मुंबई लोकलबाबत सावध भूमिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई लोकलबाबत सावध भूमिका

कोरोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ लागला आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई सध्या गट क्रमांक एकमध्ये आली असली, तरीही काही निर्बंध ’जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई लोकलबाबतही सावध भूमिका घेण्यात येत आहे.

राहुरीतील शिंदे गटाच्या 28 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे
कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या
आदर्श विद्यामंदिर सोनईत विविध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषक वितरण                        

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ लागला आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई सध्या गट क्रमांक एकमध्ये आली असली, तरीही काही निर्बंध ’जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई लोकलबाबतही सावध भूमिका घेण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यामांसोबत संवाद साधला. 

    या वेळी त्यांनी मुंबई लोकलबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ’मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली की लोकलबद्दल विचार करू. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल,’ असे त्या म्हणाल्या. ’इतरांच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने महापालिका व राज्य सरकार वागणार नाही,’ असेही महापौरांनी स्पष्ट केले. आजही मुंबईत पाचशे ते सहाशेच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या आणखी कमी व्हायला हवी. धारावीत शून्य रुग्णवाढ आहे. वरळीत काल एकच रुग्ण आढळून आला म्हणजेच मुंबईतील संसर्ग कमी होतो,’ असे त्यांनी निदर्शनास आणले. ’तिसरी लाट आली तर सगळ्यांसाठी भयंकर असेल. आता त्या विषाणूचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे सगळ्यांनी कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. जर नागरिकांनी काळजी घेतली, तर आपण ज्याप्रमाणे दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झालो. तसेच, तिसर्‍या लाटेतही यशस्वी होऊ,’ असा विश्‍वास महापौरांनी व्यक्त केला.

COMMENTS