Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक नेते सुभाष वीर यांची कन्या डॉ. साक्षीचे एमबीबीएसमध्ये घवघवीत यश

बीड : बीड येथील प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा बीड तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभ

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर; राजकुमार बाविस्कर यांची तालुकाध्यक्षपदी निवड
 ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चिंचोली विद्यालयातीचे यश 
राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  

बीड : बीड येथील प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा बीड तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वीर यांची कन्या डॉ. साक्षी सुभाष वीर हिने एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ. साक्षी हिचे प्राथमिक शिक्षण बीड येथील चंपावती विद्यालयात झाले. त्यानंतर तिने लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षेत यश मिळवत तिने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. नुकताच एमबीबीएस अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत डॉ. साक्षीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य समारंभात तिचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी आई-वडील, भाऊ तसेच नातेवाईकांच्या उपस्थितीत तिने मान्यवरांच्या हस्ते पदवी स्विकारली. डॉ. साक्षी वीर हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS