Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य

जुना वादातून केजच्या सुर्डी फाटा येथे भरदिवसा हत्या; आरोपीला तासाभरात बेड्या
आदित्य शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर; 198 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना वितरित केला जाणार असून, प्रत्येक कुटुंबाला सुमारे तीन लिटर रॉकेल देण्यात येणार आहे.
मात्र, यापूर्वी बंद करण्यात आलेले रॉकेल पुन्हा सुरू करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे, असा सवाल शेख युनूस यांनी उपस्थित केला आहे. गॅस युगात परत स्टोव्ह वापरण्याची वेळ आणायची आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. रॉकेल स्टोव्हमुळे पूर्वी अनेक अपघात झाले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. तसेच काही महिलांनी आत्महत्येसाठी रॉकेलचा वापर केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा रॉकेल वितरण सुरू केल्याने अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, रॉकेलचा वापर पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी तर होणार नाही ना, अशी शंका देखील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सरकारने या निर्णयामागील स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS