Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बडेवाडीत नारळी सप्ताहाची भक्तीमय सांगता; जनसागर लोटला; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

खरवंडी कासार : संत भगवान बाबांच्या फिरता नारळी सप्ताहाची सांगता पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे संत-महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाच्या सांगतेसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, ऍड. प्रताप ढाकणे, प्रभावती ढाकणे, बाळासाहेब आजबे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप, प्रा. लक्ष्मण हाके, राधाताई सानप महाराज, रामगिरी महाराज, गडाचे उत्तराधिकारी कृष्णा शास्त्री महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. बीड व अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच पाथर्डी आगाराने यंदा प्रथमच सप्ताहासाठी जादा बसची सोय उपलब्ध करून दिली. सोमवारी रात्री महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या कीर्तनाला ऐतिहासिक गर्दी झाली. माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “अवघ्या शंभर घरांच्या बडेवाडी गावात इतक्या भव्य स्वरूपात सप्ताहाचे यशस्वी आयोजन होत आहे, हेच भगवान बाबांचे चमत्कारिक कार्य आहे. लाखोंचा समाज शिस्तीने व महंतांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येतो, असे चित्र या सप्ताहात पाहायला मिळते.” महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनीही मार्गदर्शन करताना वैयक्तिक जीवनातील चढउतारांवर मात करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध मान्यवरांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत संघर्षातून पुढे जाण्याचा संदेश दिला. या सप्ताहामुळे बडेवाडी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले.

सहा तास भारनियमन; वीजबिल मात्र ४२ हजारशेवगावमधील प्रकार ; नागरिकांत संतापाचे वातावरण
पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
शेवगाव पोलिसांचीमद्यवाहतुकीवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्तशेवगाव पोलिसांची कामगिरी ; गुन्हा दाखल

खरवंडी कासार : संत भगवान बाबांच्या फिरता नारळी सप्ताहाची सांगता पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे संत-महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाच्या सांगतेसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, ऍड. प्रताप ढाकणे, प्रभावती ढाकणे, बाळासाहेब आजबे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप, प्रा. लक्ष्मण हाके, राधाताई सानप महाराज, रामगिरी महाराज, गडाचे उत्तराधिकारी कृष्णा शास्त्री महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. बीड व अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.

यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच पाथर्डी आगाराने यंदा प्रथमच सप्ताहासाठी जादा बसची सोय उपलब्ध करून दिली. सोमवारी रात्री महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या कीर्तनाला ऐतिहासिक गर्दी झाली.

माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “अवघ्या शंभर घरांच्या बडेवाडी गावात इतक्या भव्य स्वरूपात सप्ताहाचे यशस्वी आयोजन होत आहे, हेच भगवान बाबांचे चमत्कारिक कार्य आहे. लाखोंचा समाज शिस्तीने व महंतांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येतो, असे चित्र या सप्ताहात पाहायला मिळते.”

महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनीही मार्गदर्शन करताना वैयक्तिक जीवनातील चढउतारांवर मात करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध मान्यवरांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत संघर्षातून पुढे जाण्याचा संदेश दिला. या सप्ताहामुळे बडेवाडी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले.

COMMENTS