Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्षाताई शेरकर यांचा सन्मानपरिवर्तनवादी व्यसनमुक्ती लढ्यात सदैव सोबत-अ‍ॅड. सतीश शिंदे

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था  संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी च्या माध्यमातून व जेष्ठ नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीर

फायदा-तोटा पाहणारे आम्ही नाही; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तेलगावमध्ये कडाडून विरोध
सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस
शेतीप्रश्नी किसान सभेचा बीडला धडक मोर्चा;डॉ. अजित नवले शेतीप्रश्नी बीडमध्ये

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था  संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी च्या माध्यमातून व जेष्ठ नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीराव फड व संचालक तथा भाजपाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत फड व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सध्या कार्यरत असलेल्या मागील अनेक काळापासून शेकडो कुटुंबे व व्यसनी बांधवांना व्यसनमुक्त करून जिवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबद्ध असणार्या समुपदेशक , सामाजिक कार्यकर्त्या व कौटुंबिक सल्लागार सौ वर्षाताई आजिनाथ शेरकर  यांना नुकत्याच  राजधानी मुंबईत महात्मा शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या निमित्ताने महात्मा फुले युवा दलाच्या वतीने अँड सतिश शिंदे  यांनी सौ वर्षाताई आजिनाथ शेरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व  महात्मा फुले यांच्या जिवन संघर्षावर आधारित गुलामगिरी पुस्तक भेट दिले. या वेळी ते म्हणाले.व्यसनमुक्ती हि काळाची गरज आहे युवा पिढी हि व्यसनाच्या आहारी जात आहे.आपल्या या सामाजिक न्याय लढ्यात व समाज कार्यात महात्मा फुले युवा दल आपल्या सोबत आहे. आगामी काळात नशा मुक्त भारत अभियान या अभियानात देखील आपण योगदान देऊ असे अँड सतिश शिंदे म्हणाले कार्यमास प्रा.आजिनाथ शेरकर व सुधिर शिंदे, अमोल नेहरकर,गिताराम गायकवाड, सहदेव फड हे उपस्थित होते.

COMMENTS