Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह

बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात थोर महापुरुषांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक

जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा देवून हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार शोधा – वैभव स्वामी
महिला कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी



बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात थोर महापुरुषांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 12 फुटी पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात यावी, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले.
सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या महापुरुषांचे 4 फुटी अर्धाकृती पुतळे उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून, छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा 12 फुटी, तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि सुंदरराव सोळंके यांचे 10 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचे रिपाइंच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. मात्र, सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे न बसवता पूर्णाकृती व भव्य पुतळे उभारणे आवश्यक असल्याचे कागदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंजूर 4 फुटी पुतळ्यांची उंची वाढवून 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS