वडवणी : वडवणीच्या पाटील घराण्याचे आधारवड असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेसाहेब दादासाहेब शिंदे पाटील उर्फ दादा यांचे दि. 27 मार्च 2026

वडवणी : वडवणीच्या पाटील घराण्याचे आधारवड असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेसाहेब दादासाहेब शिंदे पाटील उर्फ दादा यांचे दि. 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता साश्रू नयनांनी वडवणी येथील पाटील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व आप्तेष्ट नातेवाईकांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. दिवंगत दादांच्या रुपाने साधी राहणी व उच्च विचारसरणीचे एक राजेशाही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणीच्या पाटील घराण्याचे आधारवड असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेसाहेब दादासाहेब शिंदे पाटील उर्फ दादा यांचे दि. 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. मात्र यातही वैद्यकीय तज्ञांनी तसेच त्यांच्या तिन्हीही चिरंजीवांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली मात्र नियतीपुढे अखेर शरणागती पत्करावी लागली. त्यांच्या जाण्याने वडवणी शहराने एक सन्माननीय आणि सर्वांशी आत्मीयतेने वागणारे एक आदर्श ज्येष्ठ व्यक्तीमत्व गमावले आहे. वडवणी
गावाला माजलगांव तालुका असतांना त्यांनी सतत दहा वर्ष माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद भूषविले होते. त्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये कधीच व्यक्तिगत कोणतेही राजकीय पद उपभोगले नाही. उलट त्यांच्या सानिध्यातील अनेकांना त्यांनी प्रोत्साहन व बळ देवून समाजकारणात व राजकारणात मोठ्या उंचीवर ते घेवून गेले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला राजकीय पदांपासून दूर ठेवले. वेळप्रसंगी कोणत्याही गोष्टीला स्वतःच्या कुटुंबातून त्याग देवून इतरांना प्रोत्साहन देण्याचे धैर्याचे व धाडसाचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. दिवंगत दादांच्या रुपाने साधी राहणी व उच्च विचारसरणीचे एक राजेशाही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता साश्रू नयनांनी वडवणी येथील पाटील स्मशानभूमीम ध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व आप्तेष्ट नातेवाईकांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये अंकुश भाऊ शिंदे पाटील, बळवंत शिंदे पाटील, संतोष अण्णा शिंदे पाटील अशी तीन मुले, मुली, नातवंड असा मोठा परिवार असून शिंदे पाटील परिवारावर कोसळलेल्या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांना ईश्वर देवो.

COMMENTS