Homeताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील दुरुस्त न झालेल्या झेडपी शाळांची तात्काळ दुरुस्ती कराकिंवा विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था करा – मोहम्मद अझरुद्दीन गोलू

पावसाळा सुरू होऊनही बीड जिल्ह्यातील गाव-खेडे-वस्तीतील अनेक जिल्हा परिषद शाळा अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. भिंतींना तडे, छत गळणे आणि इमारती कोसळ

जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्याच दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंची रोमहर्षक चढाई
सातपूर येथे “महाराष्ट्र दर्शन” दिवाळी अंकाचे प्रकाशन  
पोर्टवर जेएनपीटीच मक्तेदार



पावसाळा सुरू होऊनही बीड जिल्ह्यातील गाव-खेडे-वस्तीतील अनेक जिल्हा परिषद शाळा अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. भिंतींना तडे, छत गळणे आणि इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मोहम्मद अझरुद्दीन ए.एस. गोलू यांनी आज दि. 6/07/2026  रोजी मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले. निवेदनात ए एस गोलू म्हणाले, _गाव-खेड्यातील शाळा वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. लहान मुले अशा धोकादायक इमारतींमध्ये शिकत आहेत. तात्काळ दुरुस्ती करा: जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा दुरुस्त नाहीत अशा सर्व शाळांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.किंवा पर्यायी व्यवस्था करा:* दुरुस्ती होईपर्यंत त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टिनशेड, अतिरिक्त खोल्या किंवा जवळच्या सुरक्षित शाळेत तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या या विषयावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिव सेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मोहम्मद अझरद्दीन ए एस गोलू यांनी केली  आहे.

COMMENTS