Homeताज्या बातम्या

बुलेटच्या कर्णकर्णशः सायलन्सरला जिल्हा वाहतूक शाखेचा लगाम

बीड : पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या सुचनेवरुन तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील आणि सहाय्यक प

बीडचे माहिती अधिकारी म्हणून फहाद काजी यांनी पदभार स्वीकारला
मतभेद असणं म्हणजे असंस्कृतपण नव्हे !
अथर्व करांडेचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

बीड : पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या सुचनेवरुन तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.9 ऑगस्ट 2026 रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथे 17.00 ते 19.00 वाजण्याच्या दरम्यान कर्णकर्णश आवाजाच्या नागरिकांना त्रास होत असलेल्या 13 बुलेट चालकांच्या वाहनावर सायलेन्स जप्त करुन कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार अजिनाथ मुंडे, त्रिंबक कुडके, गणेश तळेकर, पोलीस नाईक सचिन सारणीकर, पोलीस अंमलदार संतोष मोरे, वसीम शेख, संजय टुले, तसेच शिवाजीनगर पो.स्टे.चे ग्रेड पीएसआय मच्छिंद्र राख, लिंबाजी महानोर, बीड शहरचे पोलीस अंमलदार सचिन वाघमारे, संतोष तांबे जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार अनिकेत घुले, पोलीस चालक दत्ता कदम इत्यादींनी सहभाग नोंदविला. आपल्या बुलेट वाहनाला मोडीफाय सायलेन्सर बसवून शहरात ठोऽऽऽ ठो ऽऽऽ आवाज करुन नागरिकांना वेठीस धरणार्या वाहनधारकांनी यापुढे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये असा इशारा जिल्हा वाहतुक शाखेने यावेळी दिला आहे. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई अटळ यापुढे कोणीही बुलेट सायलेन्सर मोडीफाय करुन नागरिकांना त्रास होईल असे वाहन रस्त्यावर चालवणार नाही तसेच ध्वनीप्रदुषण करणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा साउंड पोल्युशन कायद्यानुसार आणि इनव्हायरमेंट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट कायदा 1986 प्रमाणे गुन्हे नोंद करून वाहन विनापरवाना मॉडीफाय केल्याबाबत जबर दंड वसूल करण्यात येईल. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळावे असे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील यांनी कळविले आहे.

COMMENTS