Homeताज्या बातम्या

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करावे : प्रा. डॉ. प्रशांत साबळे

चौसाळा - भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले योगदान दिले, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्यलढा हा आगळावेगळा होता. त्य

अन्यथा, टोल नाके गुंडगिरीची केंद्र ठरतील !
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी
अर्धवट यश आणि अपूर्ण स्वप्ने!

चौसाळा – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले योगदान दिले, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्यलढा हा आगळावेगळा होता. त्यांनी भारताबाहेर राहून इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत साबळे यांनी केले. कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे समाजशास्त्र विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. साबळे म्हणाले की, आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याचे सर्व विद्यार्थ्यांनी स्मरण करावे व त्यांचा आदर्श घ्यावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास भिल्लारे यांनी केले. अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. पंडित खाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. व्यासपीठावर पदव्युत्तर संचालक प्रा. डॉ. सुधाकर वनवे, कमविचे उपप्राचार्य श्री गणपती ढवळशंक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंजुषा रसाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. मनीषा गिराम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. सुधीर माने, प्रा. कुशाबा साळुंखे, प्रा. सूर्यकांत देशमुख, प्रा. ए. डी. चव्हाण, प्रा. माणिक चव्हाण यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS