बीड : मुख्य पाईपलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड : मुख्य पाईपलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

बीड (प्रतिनिधी) -  शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये येणाऱ्या आसेफनगर, शहेनशहानगर, थोरातवाडी, गणेशनगर, तेरवी लाईन, बशीरगंज या भागांना पिण्याच्या पाण

Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला
Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Video)

बीड (प्रतिनिधी) – 

शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये येणाऱ्या आसेफनगर, शहेनशहानगर, थोरातवाडी, गणेशनगर, तेरवी लाईन, बशीरगंज या भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन नाला बांधून नाल्यापासून मुक्त करण्याची मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी आपले सरकार या वेबपोर्टल द्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १४ ला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आसेफनगरच्या मुख्य रस्त्यालगत असणार्‍या नाल्यामध्ये बुडालेली आहे. यामुळे ही पाईपलाईन जेव्हा-जेव्हा लिकेज होते तेव्हा-तेव्हा त्यात नाल्याचे पाणी मिसळून काळे, गढूळ, दुर्गंधीयुक्त व अळ्या मिश्रित पाणी नळांना येते. याविषयी गेल्या काही वर्षात बीड नगर परिषदेत अनेकदा निवेदने दिलेली आहेत. तसेच प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांसह नगराध्यक्षांकडे सुद्धा वैयक्तिक भेट घेऊन तक्रारी केल्या आहेत. 

तसेच काही महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष या भागात पाहणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिलेले आहे. तरीसुद्धा ही मुख्य पाईपलाईन नाल्यापासून दूर करण्यात येत नाही. तसेच प्रत्यक्षात पाच सहा फूट रुंद असलेल्या या नाल्यातून जवळपास तीन ते चार किलोमीटर लांबून सांड व घाण पाणी वाहत येते. त्यात यावेळी भरपूर प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्यासोबत नालाही वाहून गेल्याने आजघडीला या नाल्याची रुंदी जवळपास १० फूट झाली आहे. 

यामुळे पूर्वी फक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे शेजारी प्लास्टिकची मुख्य पाइपलाइन या नाल्यात बुडालेली असायची मात्र आता नाल्याची रुंदी पाच सहा फूट ऐवजी दहा फूट रुंद झाल्याने लोखंडी मुख्य पाईपलाईन सुद्धा नाल्याच्या पाण्यात २४ तास बुडालेली आहे. तरी या प्रभागातील रहिवाशांच्या आरोग्याचा विचार करून मे. साहेबांनी प्रभाग क्रमांक १४ मधील पाण्याची ही मुख्य पाईपलाईन नाल्यापासून दूर करण्याकरिता येथील नाल्याचे पाच सहा फूट रुंद व पाच सहा फूट खोल बांधकाम लवकरात लवकर करून द्यावे आणि मुख्य पाईपलाईन नाल्यापासून मुक्त करावी. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार  या वेब पोर्टल द्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

COMMENTS