बीड: बीड जिल्हा माहिती कार्यालयाचे नवनियुक्त माहिती अधिकारी फहाद काजी यांनी सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार

बीड: बीड जिल्हा माहिती कार्यालयाचे नवनियुक्त माहिती अधिकारी फहाद काजी यांनी सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने नवनियुक्त माहिती अधिकारी फहाद काझी यांचा प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि गुलाबाचे झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष शेख आयेशा यांच्यासह ’बीड प्रसार’चे संपादक समीर काझी, उपाध्यक्ष रईस खान, उपाध्यक्ष आयुब शेख,पत्रकार एजाज भाई, पत्रकार सोळंके, पत्रकार इम्रान इनामदार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना फहाद काजी यांनी पत्रकार आणि माहिती विभाग यांच्यात समन्वय ठेवून जनतेपर्यंत शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS