Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात आज रोजी यलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 7 मे रोजी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या

कोल्हारजवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग;एक हजार एकर क्षेत्राचे नुकसान, पशुपक्षी, झाडांची राख
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची पहिली सर! ५ ते १० जून दरम्यान मान्सून धडकणार! । लोकमंथन News२४
बिहारमध्ये वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू
Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम  स्वरूपाच्या पावसाची तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज | LatestLY  ...

नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 7 मे रोजी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी सुमारे 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, वादळी वार्‍याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपली कामे नियोजनबद्ध करावीत, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS