बीड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, जिल्हा वकील संघ आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट र

बीड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, जिल्हा वकील संघ आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बीड येथे जनजागृतीपर वॉकथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली होणार आहे. बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह रोखणे, बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण तसेच प्रत्येक बालकाला न्याय व शिक्षणाचा अधिकार याबाबत जनजागृती हा रॅलीचा उद्देश आहे. रॅलीत विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, विद्यार्थी, पोलीस व प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्येही 15 ऑगस्ट रोजी वॉकथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांनी केले आहे.

COMMENTS