बीड : महाराष्ट्र कामगार मंडळाने पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणार्या कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द क

बीड : महाराष्ट्र कामगार मंडळाने पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणार्या कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कामगार कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. शिष्यवृत्ती बंद झाल्यास हजारो कामगार कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन पहिली ते दहावीच्या कामगारांच्या मुलांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती सुरू करावी. आंदोलनात विविध कामगार संघटना, पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख नसीर भाई यांनी केले आहे.

COMMENTS