Homeताज्या बातम्या

’कपास क्रांती’ अभियानांतर्गत हिवरसिंगा येथे कापूस उत्पादकता प्रशिक्षण संपन्न; आधुनिक तंत्रज्ञान वापराचे आवाहन

शिरूर: केंद्र शासनाच्या ’कपास क्रांती’ अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हिवरसिंगा येथील कापूस उत्पादक शेतकरी गटातील सभासदांसाठ

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम
विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शिरूर: केंद्र शासनाच्या ’कपास क्रांती’ अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हिवरसिंगा येथील कापूस उत्पादक शेतकरी गटातील सभासदांसाठी कापूस उत्पादकता वाढविण्याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीनिवास सार्वजनिक वाचनालय, हिवरसिंगा येथे झालेल्या या कार्यक्रमात आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडलिक सानप होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री. गांगर्डे, मंडळ कृषी अधिकारी संजय फरताडे, न्यूजीवीड सीड्सचे श्री. थिटे, ज्ञानेश्वर मिसाळ, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, माऊली शिंदे आणि शिवराम राऊत उपस्थित होते.

प्रशिक्षणात कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य अंतरावरील लागवड (स्पेसिंग), एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य (खत) व्यवस्थापन, वाढ नियंत्रण तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. गांगर्डे यांनी अतिघन लागवड व क्लोज स्पेसिंग पद्धतीचे फायदे स्पष्ट करून अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

न्यूजीवीड सीड्सचे श्री. थिटे यांनी खत व्यवस्थापन व वाढ नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले, तर ज्ञानेश्वर मिसाळ आणि मंडळ कृषी अधिकारी संजय फरताडे यांनी कापूस पिकातील प्रमुख किडी व रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली.

या प्रशिक्षणास ग्रामस्थ, शेतकरी लाभार्थी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादन वाढविण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाकर सानप, प्रभाकर डोगरे, सतीश दुधाळ, भीमराव सानप, भागवत दुधाळ, अलिम शेख, नवनाथ बडे, भानुदास शिंदे, गोकुळ शिंदे, रामेश्वर पाडुळे, सिद्धेश्वर दुधाळ, कल्याण दुधाळ, जालिंदर राऊत, शाम दुधाळ, कृष्णा शिंदे यांच्यासह शेतकरी गटातील अनेक सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक संदीप जाधव यांनी मानले.

COMMENTS