कडा - कडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर टेलिफोन वायरिंगचे काम करण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी दोन मोठे खड्डे खणण्यात आले होते. संबंधित विभाग

कडा – कडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर टेलिफोन वायरिंगचे काम करण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी दोन मोठे खड्डे खणण्यात आले होते. संबंधित विभागाने वायरिंगचे काम पूर्ण केले असले तरी खड्डे मात्र आजतागायत तसेच उघडे ठेवण्यात आले होते.
या ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना या खड्ड्यांमुळे ये-जा करताना मोठी अडचण होत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठा अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली. या मागणीची संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत कर्मचाऱ्यांना पाठवून खड्डे बुजवून घेतले.
शासकीय कामासाठी खड्डे खणणे ठीक आहे, पण काम संपल्यानंतर ती जागा पूर्ववत करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत रहेमान सय्यद यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या तत्पर सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS