Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरगाव शिवारात ट्रकचालकावर दरोडा; बारा तासांत आरोपींना जामखेड पोलिसांनी केली अटक

जामखेड : ट्रक आडवून चालकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींना जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजा

‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर
परमार्थात शुद्ध भक्तीनेच भगवंत प्राप्ती : ह.भ.प. आढाव
सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक

जामखेड : ट्रक आडवून चालकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींना जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३१ मार्च २०२६ रोजी फिर्यादी संतोष बिभीषण फरताडे (रा. सोमनाथ वाडी, ता. जि. बीड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी सांगितले की, दि. ३० मार्च रोजी ते व बाळू शामराव तांबे (रा. परांडा, जि. धाराशिव) हे ट्रक (क्र. एमएच 14 एलएक्स 9969) मध्ये कोंबडीचे खाद्य घेऊन पुण्याहून माजलगावकडे जात होते.दि. ३१ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता जामखेड–साकत रोडवर, जामखेडपासून सुमारे ५ किमी अंतरावर स्पीड ब्रेकरमुळे ट्रकचा वेग कमी केला असता, एका स्कुटीस्वाराने ट्रकसमोर गाडी आडवी लावून ट्रक थांबवला. त्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी ट्रकची काच फोडून चालक व सहचालकाला मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहित्य जबरदस्तीने लुटून नेले.या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी मिळालेल्या मोटारसायकलच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत अवघ्या १२ तासांत १) शुभम सूर्यभान चव्हाण, २) शुभम ज्ञानोबा चव्हाण, ३) राम अशोक अडाले तसेच एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हे सर्व सावरगाव, ता. जामखेड येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोसई किशोर गावडे, परि पोसई पुष्कर कडू, पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देविदास पळसे, पो. कॉ. कुलदिप घोळवे, पो. कॉ.आकाश शेवाळे, पो.कॉ.ज्ञानेश्वर बेल्हेकर, पो.कॉ भागीरथ देशमाने, पो. कॉ.दत्तु बेलेकर, पो. कॉ. इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो. कॉ.नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी केली आहे जामखेड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS