Homeताज्या बातम्या

एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी; नागरिकांची त्रस्त अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे आवाहन

बीड: एसआयआर प्रक्रियेला तोंड देताना नागरिक त्यातही विशेष करून महिलावर्ग अत्यंत त्रस्त झालेले दिसून येत असल्याने ही अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.ए

नांदेडमधील कोचिंग क्लासेस व शैक्षणिक संस्थांची सुरक्षा रामभरोसे? लखनौ दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षा तपासणीची मागणी
फरार आरोपी २२ वर्षांनंतर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा
नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी

बीड: एसआयआर प्रक्रियेला तोंड देताना नागरिक त्यातही विशेष करून महिलावर्ग अत्यंत त्रस्त झालेले दिसून येत असल्याने ही अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी असे आवाहन केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबविली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविली जात असल्याचे म्हटले जात आहे. यावर काही नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत भारतीय निवडणूक आयोगाकडे एसआयआर प्रक्रिया कशासाठी राबविली जात आहे, याची माहिती मागितली असता निवडणूक आयोगाने आमच्याकडून ही प्रक्रिया राबविली जात नसल्याचे उत्तर दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मग प्रश्न पडतो की, एसआयआर प्रक्रिया नेमके कोण राबवित आहे? कारण केंद्र व राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग राबवित असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे निवडणूक आयोग ही प्रक्रिया राबवित नसल्याचे म्हणत असल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रश्न पडतो की, समस्त भारतीयांना अत्यंत क्लिष्ट, त्रासदायक व भंडावून सोडणारी ही एसआयआर प्रक्रिया राबविण्याचा अट्टाहास कशासाठी चालविला जात आहे आणि कुणाकडून? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

काही वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने जेव्हा आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू केली होती तेव्हा आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा भक्कम व ठोस पुरावा म्हणून कामी येईल, असे म्हटले होते. मात्र आज त्याच आधार कार्डला अगदी नगण्य स्वरूप देण्यात आले आहे. आता मतदारांसाठी एसआयआर प्रक्रिया राबविली जात आहे, ज्यात फक्त जो व्यक्ती जिथे वास्तव्यास आहे तेथील मतदार यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात येणार आहे.

म्हणजे फक्त मतदारसंघापुरते मर्यादित असलेले एसआयआर पुढे चालून किती महत्त्वाचे राहणार, हाही एक संशोधनाचा विषय ठरणार आहे. म्हणून भारतीय नागरिकांना खरेच याची आवश्यकता आहे का, याचा छडा लावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची सत्य वस्तुस्थिती नागरिकांसमोर येणे गरजेचे असून यासाठी एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने यावर पीएचडी करावी, असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

COMMENTS