कर्जत : येथील थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथ यात्रा या निमित्ताने दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. साक्षात पांडुरंग या दिवशी कर

कर्जत : येथील थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथ यात्रा या निमित्ताने दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. साक्षात पांडुरंग या दिवशी कर्जत मध्ये येतो अशी आख्यायिका आहे.
यावेळी प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील व तहसीलदार रवी सत्वन यांच्या हस्ते उत्सव मोतीची पूजा करून रथयात्रीची सुरुवात झाली. व मेघनाथ पाटील यांच्या हस्ते रथाच्या चाकावर नारळ वाढवून पांडुरंगाच्या मूर्तीची भव्य नगर प्रदक्षिणा सुरू झाली. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा या वर्षी देखील कायम होती. सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी पुणे, मुंबई, नाशिक, बीड, नगर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर यासह राज्यातील तसेच देशातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. या यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS