बीड: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बीडच्

बीड: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बीडच्या वतीने महात्मा फुले विद्यालय, बीड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नामदेव भाऊ दुधाळ, जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे, शहराध्यक्ष नितीन राऊत, मंगेश जमदाडे, अजिंक्य सुरवसे, महेश चौधरे, सुबोध शिंदे, शरद विटकर, शिवम बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदाताई गरुड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी रघुनाथरावजी हुंबे, श्रीमती हुंबे, खैरे सर, नाईकनवरे सर, ताटे सर, वाघमारे सर, श्रीमती त्रंबके, श्रीमती पवार, श्रीमती धोंगडे, साखरे मॅडम यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS