Homeताज्या बातम्या

अल्पसंख्याक मुस्लिम समाजावरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी शनिवारी बीडमध्ये जिल्हास्तरीय बैठक

बीड : अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि विविध सामाजिक समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या

बीडमध्ये २ ऑगस्टला ‘महाराजस्व समाधान शिबीर’; नियोजनासाठी प्रशासनाची आढावा बैठक संपन्न
कर्तव्यदक्ष बीएलओ प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे, रमण कुलकर्णींमुळे एसआयआर प्रक्रिया विनासायास; मतदारांची डोकेदुखी झाली कमी!
तीन वर्षांनंतर चोरीची ६८ हजारांची रोकड परत; शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

बीड : अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि विविध सामाजिक समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी, दि. 8 ऑगस्ट रोजी बीड येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भविष्यातील आंदोलनाची दिशा आणि समाजाच्या संरक्षणासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.

ही बैठक दुपारी 1 वाजता जी. एन. फंक्शन हॉल, मोमीनपुरा, बीड येथे आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील उलेमा इकराम, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विविध क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, देश व राज्य पातळीवर अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा. मुस्लिम समाजाला जातीय दंगली, द्वेषपूर्ण वक्तव्ये (हेट स्पीच), मॉब लिंचिंग, बुलडोजर कारवाई, धार्मिक स्थळांवरील हल्ले, सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी आक्षेपार्ह वक्तव्ये तसेच शैक्षणिक व धार्मिक संस्थांना लक्ष्य करण्यासारख्या घटनांपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. या विविध मागण्यांसाठी आगामी काळात व्यापक आंदोलन करण्याची तयारी समितीने सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार असून डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात नागपूर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी तसेच जिल्ह्यातील समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी बीडमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, धार्मिक संस्था आणि कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचे निमंत्रक ड. इलियास इनामदार, मुजतबा अहमद खान, शेख मुसा सर, मौलाना मैनू साहेब, मुशीर इनामदार, खदीरुज्जमा पठाण, अरफात खान, शेख वजीर सर, शेख मैनू, सय्यद सलमान, समीर सरकार, ड. मोमीन अखील, सलीम खान, शेख ऐतेशाम, सय्यद नबीलुज्जमा, गुड्डू चाऊस, डॉ. मोसीन सर, आबेद कादरी, सुफियान मणियार, प्रा. अमर शेख, इमरान शिकलगार, सय्यद आबेद, अब्दुल बारी, इमरान सलमान खान, मोमीन वाजेद पाशा, साद खान, अंजर पटेल, तलहा काजी, इमरान इनामदार, प्रा. जावेद पाशा, प्रा. रफिक बागवान, काजी माजेद सर, डॉ. इद्रिस हाशमी, हनीफ खान, रिजवान खान आदींसह समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

COMMENTS