नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन द्याना. सुभाषजी देसाई यांना आ. आशुतोष काळे यांच्या वतीने निवेदन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन द्याना. सुभाषजी देसाई यांना आ. आशुतोष काळे यांच्या वतीने निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी  :- नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी दे

पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर उन्हाच्या संरक्षणासाठी पाचट टाकावेत
राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
LokNews24 l पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या

कोपरगाव प्रतिनिधी  :- नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांच्या वतीने नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या आवर्तनाबाबत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन कालवा सल्लागार समितीचे सदस्य व कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार व राजेंद्र खिलारी यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई यांना दिले आहे.दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरण क्षेत्रात समाधानकारक पाणी साठा आहे. त्यामुळे यावर्षी नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन मिळावे. नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या बाबतीत विविध विषयांवर विचार विनिमय व्हावा. नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून वैजापूर व कोपरगाव तालुक्याला एकाच वेळी सिंचनाचे रोटेशन मिळावे. वितरिका क्र. १ व २ चे मेन गेट व उपवितरिकांवरील सर्व गेट दुरुस्त करून किंवा त्या ठिकाणी नवीन गेट बसवून मिळावे. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा लवकरात लवकर मोबदला मिळावा. वितरिका क्र. २ वरील भूसंपादनाची मोजणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी. भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तातडीने तयार करुण मोबदला देण्यात यावा. प्रती आवर्तनाला गावतळे, पाणी पुरवठा योजना भरून मिळाव्या तसेच कोपरगाव नगरपरिषदेचा साठवण तलाव क्र.४ व नवीन प्रस्तावित साठवण तलाव क्र. ५ यांना नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातून वरून भरून देण्याची ग्वाही द्यावी व कोपरगाव नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या प्रस्तावित तळ्यामध्ये सविस्तर रित्या जलद कालव्यातून पाणी मिळण्यास परवानगी मिळावी आदी मागण्या दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांच्यावतीने  करण्यात आल्या आहे. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही ना. सुभाषजी देसाई यांनी दिली आहे.चौकट :- ना.सुभाषजी देसाई यांनी आस्थेवाईकपणे आ.आशुतोष काळे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. तसेच मतदार संघात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा गोरक्षनाथ जामदार व राजेंद्र खिलारी यांच्याकडून जाणून घेतला.फोटो ओळ – गोदावरी कालव्याच्या आवर्तनाबाबत आ. आशुतोष काळे यांच्यावतीने ना. सुभाषजी देसाई यांना निवेदन देतांना कालवा सल्लागार समिती सदस्य गोरक्षनाथ जामदार व राजेंद्र खिलारी

COMMENTS