Homeताज्या बातम्या

नाशिकमध्ये हायटेक बनावट नोटा छापणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; नोटा तयार करण्याची क्लृप्ती पाहून पोलीसही चकित, ५ जणांना बेड्या!

नाशिक - नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या एका मोठ्या कारखान्याचा पोलिसांनी छाप

विद्यार्थी आंदोलनाचा धसका!
वारंगा येथील नयीआबादी परिसरात बॅरिकेड्स तोडून पळालेल्या इर्टिगाचा 30 किलोमीटर पाठलाग; 240 किलो कथित गोमांस जप्त
व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
Nashik Crime : बनावट नोटांसह सात संशयितांना अटक

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या एका मोठ्या कारखान्याचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटांसह छपाईचे साहित्य व केमिकल असा मोठा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींना रंगेहात अटक केली आहे. आरोपींनी वापरलेली बनावट नोटा तयार करण्याची अनोखी पद्धत पाहून खुद्द पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खऱ्या चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्यांची शाई दुसऱ्या कागदावर उमटवून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करत असत. इतकेच नाही तर १० लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष आरोपींकडून दिले जात होते. असाच एक मोठा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी अचानक छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी अमरेश्वर आईथा, मच्छिंद्र घनदाट, हिरामण दाते, गोकुळ दाते आणि दासरी सत्यइ या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

छापेमारीदरम्यान पोलिसांनी नोटा छपाईसाठी लागणारे प्रिंटर, विशेष केमिकल, कागद आणि लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. शांत आणि कोणाच्याही संशयात न येणाऱ्या बंगल्यात हा बेकायदेशीर प्रकार सुरू होता. प्राथमिक तपासात या रॅकेटचे जाळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसरले असल्याचे समोर आले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठे धाबे दणाणले आहेत. पोलीस आता या रॅकेटचे देशातील इतर धागेदोर शोधत आहेत.

COMMENTS