Homeताज्या बातम्या

अंबाजोगाईत पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा; दोन महिलांची सुटका; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंबाजोगाई - सेलू रोड परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा मारून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफा

हमीभाव, पीकविमा व अतिवृष्टी अनुदान द्या; भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार रद्द करा : नांदूर फाटा येथे किसान संघर्ष समितीचा भव्य रास्ता रोको; प्रा. सुशीलाताई मोराळे यांची सरकारवर टीका
संत आणि शेतकरी एकरूपच : प्रा. इंद्रजित भालेराव
पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा; निर्मीड पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! 'या' भोजपुरी अभिनेत्रीला अटक, 3  मॉडेल्सची सुटका | Navarashtra

अंबाजोगाई – सेलू रोड परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा मारून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या आंटीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. परभणी जिल्ह्यातील डेबेवाडी येथील रहिवासी आणि सध्या अंबाजोगाईत राहणारी शिवकन्या नवनाथ फड ही आंटी बाहेरच्या शहरातून महिला आणून त्यांचाकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी सेलू रोडवरील पिताजी सारडा नगरीतील अपार्टमेन्टमधील फ्लॅट नंबर डी-फोर मधील कुंटनखान्यावर छापा मारण्यासाठी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीने पंचांना बोलावून पोलीस पथकाने बनावट ग्राहक तयार केला. डमी ग्राहकाकडे पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन त्याला संबंधित फ्लॅटवर पाठवण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांनी अपार्टमेन्टच्या सर्व बाजूंनी घेराबंदी केली. डमी ग्राहकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून व्यवहार निश्चित केला आणि खिडकीतून बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. इशारा मिळताच पोलीस पथकाने तात्काळ फ्लॅटचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. पाहणीदरम्यान एका खोलीत पीडित महिला आणि डमी ग्राहक आढळून आले, तर दुसर्‍या खोलीत वेश्या व्यवसाय चालवणारी महिला चालक उपस्थित होती. पोलिसांनी घटनास्थळावरून डमी ग्राहकाला दिलेल्या नोटा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवकन्या फड (वय 40) हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुतळे, पोलीस अंमलदार वडकर, चादर, कांबळे, हारळे आणि महिला पोलीस अंमलदार पाचपिंडे व जाधव यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक जोगदंड पुढील तपास करत आहेत.

COMMENTS