बीड : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील सोलर प्लांटमधून निष्काळजीपणे तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याने शेजारील शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झा

बीड : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील सोलर प्लांटमधून निष्काळजीपणे तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याने शेजारील शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत संबंधित सोलर प्लांट मालकावर गुन्हा दाखल करून बाधित शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चा आणि लोकलढा आंदोलन यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुक्कडगाव येथील सोलर प्लांटमध्ये पाण्याच्या हौदामध्ये घातक तणनाशक मिसळून तीन एचपी क्षमतेच्या फवारणी पंपाद्वारे तणनाशकाची फवारणी करण्यात आली. फवारणी करताना संरक्षक कापड, पत्रे किंवा अन्य आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे तणनाशकाचा फवारा शेजारील शेतांमध्ये जाऊन पिकांवर पडला. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या पिकांची पाने करपून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित सोलर प्लांट मालकावर गुन्हा दाखल करावा, नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, तसेच लोकलढा आंदोलनाचे दिनेश गुळवे, संतोष भारती, राहुल लोंढे, राजाभाऊ कुटे, गोरख शिंदे, दत्ता चौरे, अण्णासाहेब शिंदे, भारत शिंदे, मदेंद्र नवले, चंद्रकांत नवले, राहुल शिंदे, दत्तात्रय पठाडे, सतीश लोणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS