Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

कराड / प्रतिनिधी : पोतले (ता. कराड) येथील श्री. स्वयंभू मारुती मंदिरामधील दानपेटी फोडून त्यातील एक ते दीड लाखाची रोकड चोरून नेल्याची तक्रार कराड

पोकलेनचे ऑईल पंप चोरणार चोरटा नाशिक ताब्यात
पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा

कराड / प्रतिनिधी : पोतले (ता. कराड) येथील श्री. स्वयंभू मारुती मंदिरामधील दानपेटी फोडून त्यातील एक ते दीड लाखाची रोकड चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रात्री दीड ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. या चोरीमुळे पोतले गावात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोतले येथील जुने गावठाणात मारूती मंदिर आहे. या मंदिरात देवाला देणगीसाठी पेटी ठेवण्यात आलेली आहे. गुरूवारी मध्यरात्री 1.30 ते पहाटे 2.45 वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली. सकाळी 6. 30 वाजण्याच्या सुमारास गावकरी मंदिरात गेले असता, चोरीची घटना लक्षात आली. यावेळी मंदिरात दानपेटी नसल्याचे लक्षात आले. मंदिराचे कुलुपूही फोडण्यात आले होते. दानपेटी पोतले ग्रामपंचायत कार्यालया शेजारील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर आढळून आली. दोनपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली असून त्यामधील साधारण 1 ते दीड लाख रूपयांचे लंपास झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS