Homeताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेत महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचे यश; ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!

श्रीगोंदा: महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत व

संगमवाडीचे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी!
विठ्ठल नामाच्या गजरात वडवणी ते श्रीक्षेत्र थोरले पंढरी पोखरी पायी दिंडी उत्साहात संपन्न
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

श्रीगोंदा: महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. या अभिमानास्पद यशानिमित्त कारंजकर कुटुंबाच्या वतीने विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात कारंजकर कुटुंबाने विद्यालयाला स्मृतिचिन्ह प्रदान करून शैक्षणिक कार्याचा सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम, योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची चिकाटी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, उत्तर विभाग गुणवत्ता विकास कक्षाचे मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष पिटर रणसिंग, जेष्ठ पत्रकार विष्णू धुमाळ, आदर्श शिक्षक रामदास ठाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना स्पर्धात्मक युगात शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले असून, त्याचेच हे यशस्वी फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही विद्यालयाने अशाच प्रकारे गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापिका शेख एस. ए. यांनी कारंजकर कुटुंब, उपस्थित सर्व मान्यवर, पालक, पत्रकार बंधू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS