कॅप्टन अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्राने’ सन्मानित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅप्टन अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्राने’ सन्मानित

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च 'वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आ

वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिल्याने निवडणूक संधी…
लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.
मनसेची कोविड वॉररूम रुग्णांच्या फायद्याची

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान करून त्यांचा गौरव केला.अभिनंदन यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा पाठलाग करून त्यांचे अत्याधुनिक एफ-16 हे विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना सन्मानित करण्यात येते. पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान अभिनंदन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आज, सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आले. जम्मू-काश्मिरातील पुलवाम येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील जिहादी दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले होते. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी विमानांनी भरतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-16 हे अमेरिकी लढाऊ विमान पाडले होते. या हल्ल्यादरम्यान अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त होऊन पाकिस्तानी हद्दीत कोसळले होते. त्यावेळी अभिनंदन यांना दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात रहावे लागले. परंतु, भारताची आक्रमक भूमिका पाहता पाकिस्तानने अभिनंदन यांची बिनशर्त सुटका केली होती.

COMMENTS