नांदेड: दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने बुध

नांदेड: दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने बुधवारी नवा मोंढा येथील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत तीव्र घोषणाबाजी केली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व महानगराध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी दिल्लीतील आंदोलनावर जोरदार टीका करत पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर झालेला गोंधळ हा सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गंभीर विषय असल्याचा आरोप केला. अशा प्रकारच्या आंदोलनाचा देशभर निषेध करण्यात येत असून नांदेडमधील आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात उपमहापौर दीपकसिंह रावत, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, सरचिटणीस विजय येवनकर, संतोष मुळे, नगरसेवक किशोर स्वामी, आशिष नेरळकर, विजय गंभीरे, शीतल खांडील, मनोजराज भंडारी, संजय घोगरे, मिलिंद देशमुख, बजरंग ठाकूर, राजू यन्नम, तुळजेश यादव, ज्योती कल्याणकर, कविता गड्डम, शांभवी साले, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव, अभिषेक सौदे, साहेबराव गायकवाड, अमोल कदम, बागड्या यादव यांच्यासह भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका मांडली. काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले असले तरी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले.

COMMENTS