Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूरमध्ये भाजपचा जल्लोष; 3 राज्यांतील विजयाचा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

माहूर : भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा जल्लोष माहूर शहरात म

कुलूपबंद काँग्रेस कार्यालयामुळे कार्यकर्त्यांत नाराजी; केरळ विजयाचाही उत्साह गायब
डक दाम्पत्याच्या भाजपप्रवेशाचा गाजावाजा नेमका कुणासाठी?महायुतीत नवा संघर्ष पेटणार? नांदेड उत्तरवर भाजपची पुन्हा नजर
तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे
दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष | डीडी न्यूज  ऑन एअर

माहूर : भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा जल्लोष माहूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बस स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप आणि घोषणांनी परिसर जल्लोषमय झाला होता.
या विजयोत्सवावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, राजेंद्र केशवे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, नागोराव सुर्वे, ज्योतीराम राठोड, अपील बेलखोडे, अजय पवार, फिरोज खान पठाण, रहमत भाई, गौरव जैस्वाल, निलेश तायडे, अशोक जोशी, योगेश परसवाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या विजयामुळे माहूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

COMMENTS