Homeताज्या बातम्या

रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा ट्रक जप्त, चालक-मालकावर गुन्हा दाखल

नायगाव: अवैध रेती वाहतुकीविरोधात रामतीर्थ पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि

धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री दुचाकीस्वाराला लुटणार्‍या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद
बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा; डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
पवार कुटुंबियांच्या आनंदात मुंडे परिवार सहभागी! बाळदादा पवार यांच्या चिरंजीवाच्या विवाहास ना. पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती
Nanded News : अर्धापूर पोलिसांकडून वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई; एक कोटी  रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त | Navarashtra

नायगाव: अवैध रेती वाहतुकीविरोधात रामतीर्थ पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. २६ सी.व्हिए. ९५५५ क्रमांकाचा भारत बेंज कंपनीचा हायवा ट्रक नरसी-मुखेड मार्गावरील गोदावरी ट्रॅव्हल्स पॉईंट येथील पार्किंग मैदानात संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तपासणी केली असता, या ट्रकमध्ये कोणतीही अधिकृत वा वैध परवानगी नसताना सुमारे पाच ते सहा ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ संबंधित हायवा ट्रक जप्त करत चालक व मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात रामतीर्थ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अवैध रेती वाहतुकीच्या साखळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने अधिक माहिती संकलित केली जात आहे.

COMMENTS