Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंडलवाडीत स्मार्ट मीटर बसविण्यावरून नागरिकांत नाराजी

कुंडलवाडी : कुंडलवाडी येथे स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या सुमारे 70 टक्के घरांमध्ये स्मार्ट

अर्जापूर हे गाव 3 दिवसापासुन अंधारात
कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीरचे खोदकाम; नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या वतीने हा उपक्रम
स्मार्ट' खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे 'मीटर' बिघडणार Ratnagiri Marathi  News | Citizens oppose smart meters being installed by Mahavitaran | Latest  Ratnagiri News at Lokmat.com

कुंडलवाडी : कुंडलवाडी येथे स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या सुमारे 70 टक्के घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून उर्वरित 30 टक्के घरांमध्ये अद्यापही मीटर बसविण्याचे काम प्रलंबित आहे. गेल्या एक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू असतानाही पूर्ण काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
ज्या घरांमध्ये नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले.तर काही नागरिकांचे म्हणणे आहे की, नवीन मीटरमुळे बिल जास्त येत असल्याने संताप व्यक्त करत आहेत.तर जूने मिटर वाल्यांना विज बिल कमी येत असल्याने काहींना बिलाच्या पद्धतीबाबत संभ्रम आणि नाराजी देखील आहे. त्यामुळे कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, महावितरणच्या कंत्राटदारांवर योग्य नियंत्रण नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असून कामाची गती मंदावली असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. अद्याप 30 टक्के मीटर बसविण्याचे काम प्रलंबित असून, याबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उर्वरित मीटर बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

COMMENTS